Skip to main content

Employment in India.

अफगाणिस्तानातील परीस्थिती, अफगाण तालिबान, आणि भारत-अफगाण संबंधांबद्दल जाणून घ्या.


# अफगाणिस्तानातील परिस्थिती जाणून घ्या.

    अफगानीस्तानचा इतिहास हा तसा फार जुना. सण सतराशेच्या आसपास अहमद शाह दुर्राणीने आशियात आपली राजवट थाटली आणि तेथून अफगाणिस्तान या देशाची भौगोलिक ओळख निर्माण झाली. बरे इतिहासात जास्त न जाता आपण अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती समजून घेऊया.

    भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी तालिबानने पुन्हा एकदा शस्त्र आणि भितीच्या जोरावर अफगाणिस्तानात आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तालिबानचा संस्थापक अब्दुल घनी बरादर यास येथील पुधील राष्ट्रपती बनवण्याचा मनसुब तालिबान्यांचा आहे. अशा भयावय परिस्थितीत अफगाणिस्तानचे पूर्व राष्ट्रपती अशरफ घणी यांनी देश पलायन केले. 

    ज्या अफगाण तालिबानला USA, UK, रशिया अशा महासत्ता रोखू शकल्या नाहीत त्यास अफगाणिस्तानातील उत्तरेकडील भागातील पंजशिर दरीत (The valley of five lions) अजुनही प्रतिकार मिळत आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखाली Northern Alliance तालिबान्यांना प्रतिउत्तर ठरत आहे. 

Afghan War
Image source - Google | Image by - The National Interest

    या साऱ्या संघर्षापोटी अफगानिस्तानात गृहयुद्ध सुरू होऊन देशाचे विघटन होते की काय याची भीती सतावतेय.

# अफगाण तालिबान बद्दल जाणून घ्या.

    A true conflict म्हणजे खरा संघर्ष सुरू झाला १९७९ साली. अफगाणिस्तानात मुजाहिद्दीन या जिहादी संघटनेचा पसराव झपाट्याने होत होता, त्या काळातील USSR म्हणजे आजच्या रशियाने दहशतवाद रोखण्यासाठी अफगणिस्तानावर चढाई सुरू केली. 

    मध्य आशियातील एक strategic देश USSR या communist राष्ट्राच्या पथ्याखाली पडत आहे हे बघितल्यावर अमेरिकेने अफाणिस्तानातील रशिया विरोध गटांना हत्यारे आणि पैसा पुरवणे सुरु केले. 

    कालांतराने या गटांची एक संघटना होऊन तीस तालिबान असे नाव पडले. तालिबान या शब्दाचा literal meaning विद्यार्थी असा होतो. तालिबान गुटातील बहुदा संख्या पशतुन जमातीची आहे. या संघटनेचे विचारधारा देवोबंडी तत्वावर (देवोबंडी हे व्यक्तीचे नाव) आधारित असून इस्लामिक शरिया कायद्यानुसार चालते.

Afghan Taliban
Image source - Google | Image by - Wikimedia Commons

    याच तालिबानने अफगाणिस्तानात १९९६ साली शस्त्राच्या जोरावर सत्ता मिळविली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती २०२१ साली होताना दिसतेय. हल्लीच झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीमध्ये तालिबानला आतंगवादी संघटना म्हणून संबोधण्यावर अनेक राष्ट्रांचा विरोध होता, त्यामूळे तालिबान आज ना उद्या अफगाणिस्तानात आपले सरकार थाटेल यात शंका नाही.

# भारत आणि अफगाणिस्तानातील संबंधांविषयी जाणून घ्या.

    भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात, १९५० मध्ये भारताने अफगाणिस्तानासोबत पाच वर्षीय मैत्री करार केला. याच कराराच्या आधारावर भारताने १९७३ मध्ये रिपब्लिक ऑफ अफगानिस्तानास मान्यता दिली. 

    रशियाची १९७९ मधिल अफगान चढाई आणि त्याचे फलित असे तालिबानी शासन या साऱ्यात अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध हे फारच जटिल झाले होते. अफगाणिस्तानातील तालिबानी शासन हटवण्यासाठी Norther Alliance या संघटनेला भक्कम देशांचा पाठिंबा होता. त्यात भारतानेही अप्रत्यक्षपणे मदत केली. 

    पुढे २००१ च्या अमेरिकेच्या अफगान स्वारीनंतर स्थापन झालेल्या लोकनियुक्त सरकारसोबत भारताने पुन्हा आपले संबंध स्थापित केले. अफगाणिस्तानातील state of the art असे संसद भवन असो किंवा विवीध धरणे, रस्ते बांधण्यामध्ये, military hardware यावर भारताने आतापर्यंत प्रत्यक्ष २३००० कोटी रुपये खर्च केले. त्याचबरोबर इराणमधील चाबहार बंदराचा उपयोग करून भारत अफगाणिस्तानद्वारे मध्य आशियाइ देशांसोबत व्यापार सबंध वाढवू इच्छितो.

India-Afghanistan relations

Image source - Google | Image by - Flickr

    आपल्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात ठेऊन इतिहासात पहिल्यांदा भारताने तालिबान्यांसोबात चर्चा सुरू केली आहे.

.

.

.

If you like this article, please share it. 

#sharetheknoledge

.

Follow more on 

Youtube - https://youtube.com/channel/UC8-CDQLucDKRYNBMhwt57Xg

Instagram - https://instagram.com/acontext.learn?utm_medium=copy_link

Telegram - https://t.me/acontextlearn

.

Follow creator on 

Instagram - https://instagram.com/i_vishalshinde?igshid=15mef70wqgt03



Comments